शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 22:54 IST

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक ज्येष्ठ संसदपटू आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मुंबई -  विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक ज्येष्ठ संसदपटू आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या श्री. देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकहिताशी जपलेली बांधिलकी लक्षणीय आहे. विशेषत: डोंगरी विकास योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुक्यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार मोलाचा ठरला. तसेच राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून विविध विभागांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांनी या वरिष्ठ सभागृहाचे प्रदीर्घ काळ केलेले नेतृत्व कायम स्मरणात राहील.

जनसेवेचा आदर्श वस्तुपाठ - नितीन गडकरी

विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. मी विधानपरिषदेचा सदस्य असताना शिवाजीराव आमचे ज्येष्ठ सहकारी होते. सभापती या नात्याने सभागृहाचे कामकाज चालविताना ते चांगल्या कामाचे कौतुक करायचे आणि काही चुका झाल्या तर संयमी शब्दात कानउघाडणीही करायचे. ‘ग्रामीण भागातील सामान्य माणूस हाच आपल्या राजकारण, समाजकारणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे’, असे ते आग्रहाने नेहमी सांगायचे. १९६७ च्या कोयनाच्या भीषण भूकंपाच्या वेळी गावकºयांच्या पुर्नवसनासाठी शिवाजीरावांनी केलेले कार्य आम्हा सर्वच लोकप्रतिनिधींसाठी जनसेवेचा आदर्श वस्तुपाठ आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपणाºया या ज्येष्ठ संसदपटूला माझी विनम्र श्रद्धांजली. 

शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरवला - सुधीर मुनगंटीवार

  विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक आणि समन्वयी नेतृत्व हरवले आहे अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणतात की, राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅटट्रिक देशमुख यांनी केली होती. काँग्रेस पक्षाचा एक आधारवड म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जायचे. प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेल्या श्री. देशमुख यांनी शिराळा मतदार संघाचे नेतृत्व केले. गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अशा सर्वच विभागांची धुरा  त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतांना दायित्वाप्रतीची त्यांची एकनिष्ठता सर्वांनीच अनुभवली. विधान परिषदेचे सभापती म्हणून काम करतांना त्यांचा समन्यायी दृष्टीकोन,  राज्य विकासाची तळमळ, निर्णयामागची संवेदनशीलता दिसून आली.  त्यांच्या जाण्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

 

शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड -  अशोक चव्हाण

विधानपरिषदेचे माजी सभापती व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.  

शिवाजीराव देशमुख यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, शिवाजीराव देशमुख आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य ते विधान परिषद सभापती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. राज्य सरकारमध्ये माहिती जनसंपर्क, पाटबंधारे, अन्न नागरी पुरवठा, ग्रामविकास, कृषी, सहकार अशा विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे कार्य त्यांनी केले. राजकारणासोबत सहकार, कृषी,  शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र