भाडेकरूमुळे घरमालक कोठडीत
By Admin | Updated: May 11, 2016 04:15 IST2016-05-11T04:15:09+5:302016-05-11T04:15:09+5:30
साधा सरळ वाटणाऱ्या भाडेकरूची तुम्ही शहानिशा केली आहे का? केली नसेल तर करून घ्या. त्याची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या.

भाडेकरूमुळे घरमालक कोठडीत
नागपूर : साधा सरळ वाटणाऱ्या भाडेकरूची तुम्ही शहानिशा केली आहे का? केली नसेल तर करून घ्या. त्याची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या. तुम्ही हलगर्जीपणा दाखवला अन् तुमचा भाडेकरू एखादा गुन्हेगार निघाला तर तुमच्यावर नाहकच पोलीस कोठडीत जाण्याची वेळ येऊ शकते. होय, हुडकेश्वरमधील गौरी नामक एका घरमालकावर ही वेळ आली आहे.
घरमालक कॅटरर्सचे काम करतात. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या घरी एक भाडेकरू ठेवला. तो, पत्नी अन् मुली असे हे कुटुंब होते. परंतु तो कुठून आला, काय करतो, याची शहानिशा करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. घरमालकाने भाडेकरुची माहिती पोलीस ठाण्यात दिली नाही. पोलिसांनी भाडेकरू राहात असलेल्या घराची झडती घेतली. तो भाडेकरू गुन्हेगार असल्याने पोलिसांनी घरमालकाला अटक केली. (प्रतिनिधी)