राज्यातील ‘गृह’कलह चव्हाटय़ावर

By Admin | Updated: December 10, 2014 02:43 IST2014-12-10T02:43:55+5:302014-12-10T02:43:55+5:30

राज्यात नव्या सरकारने कारभार सुरू करून काही दिवस उलटत असतानाच गृह खाते आणि पोलीस अधिकारी यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर येण्यास सुरुवात झाली आहे.

'Home' in the state at Chawatyay | राज्यातील ‘गृह’कलह चव्हाटय़ावर

राज्यातील ‘गृह’कलह चव्हाटय़ावर

मंत्रलयातून शिष्टाचारभंग : अभिमानाच्या मुद्दय़ावर पोलिसांची एकी
डिप्पी वांकाणी - मुंबई
राज्यात नव्या सरकारने कारभार सुरू करून काही दिवस उलटत असतानाच गृह खाते आणि पोलीस अधिकारी यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर येण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ पोलीस आणि अन्य अधिका:यांच्या बैठकीला बोलावणो न आल्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी बैठकीला उपस्थिती टाळत आपल्या कनिष्ठ अधिका:याला तिकडे न जाण्यास सांगितले. पोलीस व सरकारी वतरुळात सध्या हा मुद्दा चर्चेचा बनला आहे. 
या संदर्भात एका वरिष्ठ आयपीएस अधिका:याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले, की काही दिवसांपूर्वी पोलीस दलातील अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिका:याला मुख्यमंत्री, प्रधान सचिव, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आदी मान्यवरांबरोबर झालेल्या बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना मिळाली होती. या अधिका:याने दयाळ यांना त्याची माहिती दिल्यावर दयाळ यांनी त्या अधिका:याला बैठकीला जाऊ नये, असे सांगितले. आता मुख्यमंत्र्यांकडे गृह खात्याचा कार्यभार आहे आणि त्यांच्या बैठकीला राज्याच्या पोलीसप्रमुखाला आमंत्रित करणो हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. पण या बाबतीत दयाळ यांना सूचना न देता कनिष्ठ अधिका:याला मुख्यमंत्र्यांनी थेट बोलावून घेतले. हा संकेत व शिष्टाचाराचा भंग आहे. अनेक आयपीएस अधिका:यांनी या बाबतीत दयाळ यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. 
 
..तर पोलीस प्रमुखाची गरज काय ?
च्पोलीस खात्यात जेव्हा एखाद्या अधिका:याला एखाद्या उच्च पातळीवरील बैठकीला बोलावले जाते, तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिका:याला त्याची कल्पना देणो गरजेचे आहे. 
च्आजवर या खात्याचा व्यवहार असाच चालत आला आहे. या बाबतीत दयाळ यांना माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आम्ही त्याचे समर्थन करतो. 
च्जर सर्व गोष्टी गृह खाते थेट करणार असेल तर राज्याच्या पोलीसप्रमुखाची गरजच काय, अशी खेदकारक प्रतिक्रिया अन्य एका आयपीएस अधिका:याने दिली. 

 

Web Title: 'Home' in the state at Chawatyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.