सोलापूरात सिध्देश्वर यात्रेचा होम प्रदीपन सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न
By Admin | Updated: January 15, 2017 13:36 IST2017-01-15T13:36:04+5:302017-01-15T13:36:04+5:30
सिध्देश्वर यात्रेतील होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. होमकुंडात तयार करण्यात आलेल्या कुंभार कन्येच्या प्रतिकृतीस अग्नी देताच भाविकानी ' एकदा भक्तलिंग हर्र बोला.

सोलापूरात सिध्देश्वर यात्रेचा होम प्रदीपन सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 15 : सिध्देश्वर यात्रेतील होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. होमकुंडात तयार करण्यात आलेल्या कुंभार कन्येच्या प्रतिकृतीस अग्नी देताच भाविकानी ' एकदा भक्तलिंग हर्र बोला.. हर्र, श्री सिध्देश्वर महाराजकी जय' असा जयघोष केला.
सायंकाळी पाच ला सुरु झालेला हा सोहळा मध्यरात्री दीडच्या सुमारास पार पडला. यात्रेचे मानकरी हिरेहब्बू यानी अग्नीकुंडात कुंभारकन्येच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडीचोळी केली व विधीवत पुजा बांधली.
होम विधी नंतर भाकणुकीचा कार्यक्रम झाला. दिवसभर उपवास घडवलेला वासराला सिध्देश्वर मंदिराच्या समोर आणले गेले. काही वेळ स्तब्ध ठेवल्यावर वासरापुढे बोर, धान्य ठेवण्यात आले त्यानंतर वासराचे औक्षण करण्यात आले. यावेळी वासराने मल विसर्जन केले आण वासरु घाबरले नाही त्यामुळे यंदा पाउस पाणी व्यवस्थित हौउन पिके चांगली येतील आणि वासरु न घाबरता स्थिर राहिले त्यामुळे कोणतीही आपत्ती वा नैसर्गिक संकट येणार नाही अशी भाकणूक केली गेली.