होमगार्ड ‘मॉक ड्रिल’ केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 04:36 IST2016-06-30T04:36:52+5:302016-06-30T04:36:52+5:30

नैसर्गिक अथवा अन्य संकटाच्या काळात नागरी सुरक्षा स्वयंसेवक मदतीला धावून येतात

Home guards 'mock drill' only on paper | होमगार्ड ‘मॉक ड्रिल’ केवळ कागदावर

होमगार्ड ‘मॉक ड्रिल’ केवळ कागदावर

डिप्पी वांकाणी,

मुंबई- नैसर्गिक अथवा अन्य संकटाच्या काळात नागरी सुरक्षा स्वयंसेवक मदतीला धावून येतात. यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जाते; पण या एकूण प्रकरणातच गोलमाल असल्याची माहिती समोर येत आहे. मॉक ड्रिल हे कागदावरच होत असून, चक्क गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तींनाही या सुरक्षारक्षकांत सामावून घेतल्याचे प्रकार घडत आहेत. हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, नकली ‘मॉक ड्रिल’ प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मॉक ड्रिलच्या आयोजनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी रक्कम मंजूर करून घेतली खरी; पण कुठलेही प्रशिक्षण दिले गेले नाही. विशेष म्हणजे ७५ वर्षांवरील व्यक्ती जे की शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांनाही नागरी सुरक्षा स्वयंसेवक केले जात आहे. या विभागाने वयोमर्यादेबाबतही नवे नियम बनविले असून, अशा ३५,००० दलांची स्थापना करण्यात आली आहे. नागरी सुरक्षेसाठी सरकारकडून दरवर्षी १५ कोटी रुपयांची तरतूद असते; पण प्रशिक्षणासाठी फक्त दोन ते तीन कोटी रुपये खर्च होत आहेत. नैसर्गिक संकट, आग, इमारत कोसळणे, पूर आदी संकटाच्या काळात नागरी सुरक्षा स्वयंसेवक हे मदतीला धावून येतात आणि प्रसंगी प्राथमिक आरोग्यसेवाही पुरवतात. त्यासाठी नियमितपणे मॉक ड्रिल केले जाते. दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी एका स्वयंसेवकास ४५० रुपये दिले जातात, तर एका मॉक ड्रिलसाठी १५० रुपये प्रति दिवस याप्रमाणे रक्कम दिली जाते, अशी माहिती होमगार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्वयंसेवकासाठी आता वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे करण्यात आली आहे, तर ५५ वर्षांपर्यंतची व्यक्ती यात सहभाग नोंदवू शकेल.
>७५ वर्षांचे स्वयंसेवक; शारीरिकदृष्ट्या असक्षम
एका ठिकाणी जेव्हा अचानक तपासणी करण्यात आली तेव्हा मॉक ड्रिलसाठी आलेल्या एका स्वयंसेवकाने सांगितले की, आपण मस्टरवर सही करण्यासाठी आलो आहोत.तर काही व्यक्ती हे ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे तर काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे आढळून आले आहे. मॉक ड्रिलच्या आयोजनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी रक्कम मंजूर करून घेतली खरी; पण कुठलेही प्रशिक्षण दिले गेले
नाही. विशेष म्हणजे ७५ वर्षांवरील व्यक्ती जे की शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांनाही नागरी
सुरक्षा स्वयंसेवक केले
जात आहे.

Web Title: Home guards 'mock drill' only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.