14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोलपंपांना सुट्टी

By Admin | Updated: May 11, 2017 19:44 IST2017-05-11T19:44:13+5:302017-05-11T19:44:13+5:30

येत्या रविवारपासून पेट्रोलपंपांना रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल, तर सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच पेट्रोलपंप चालू राहतील, असा इशारा पेट्रोलपंप चालकांनी दिला आहे.

Holidays on petrol pump every Sunday from May 14th | 14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोलपंपांना सुट्टी

14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोलपंपांना सुट्टी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - येत्या रविवारपासून पेट्रोलपंपांना रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल, तर सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच पेट्रोलपंप चालू राहतील, असा इशारा पेट्रोलपंप चालकांनी दिला आहे. तेल कंपन्यांनी बैठकीसाठी न बोलावल्याने राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पंप चालवण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा आणि त्यांना दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारने अपूर्वाचंद्रा कमिटीद्वारे तेल कंपन्यांना दिले होते. मात्र त्याचं गेल्या चार वर्षांपासून पालन करण्यात आलेलं नाही. अनेकदा पत्रव्यवहार करुनही तेल कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप पेट्रोलपंप चालक संघटनांनी केला आहे.
राज्यात 14 मे पासून प्रत्येक रविवारी सर्व पंपचालक सामूहिक सुट्टी घेतील. या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीही मिळणार नाही, असं पेट्रोलपंप चालकांनी स्पष्ट केलं आहे. तर 15 मे पासून महाराष्ट्रातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सिंगल शिफ्टनुसार चालतील, असंही पेट्रोलपंप चालकांनी सांगितलं आहे.

Web Title: Holidays on petrol pump every Sunday from May 14th