महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेगाब्लॉकला सुट्टी
By Admin | Updated: November 22, 2014 03:14 IST2014-11-22T03:14:26+5:302014-11-22T03:14:26+5:30
मध्य रेल्वे मेगाब्लॉक घेऊन मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्गांवर कामे केली जात आहेत. मात्र येत्या ६ आणि ७ डिसेंबरला मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेगाब्लॉकला सुट्टी
मुंबई : मध्य रेल्वे मेगाब्लॉक घेऊन मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्गांवर कामे केली जात आहेत. मात्र येत्या ६ आणि ७ डिसेंबरला मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी मुंबईत येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेमार्गाचा बोऱ्या वाजत आहे. त्यामुळे रविवारी मेगाब्लॉक घेत असलेल्या मध्य रेल्वेने शनिवारीही ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन शनिवारपासूनही मेगाब्लॉक घेतला जात आहे. मात्र शनिवारी किंवा रविवारी येणाऱ्या सणासुदीच्या तसेच अन्य सुट्ट्यांच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मेगाब्लॉक घेतला जात नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने येत्या ६ आणि ७ डिसेंबर रोजीही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेचे म्
ाुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. ७ डिसेंबरला रविवार येत असला तरीही या दिवशी
घरी परतणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी असते. त्यांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी रविवारी ब्लॉक
घेणार नसल्याचे पाटील
म्हणाले. (प्रतिनिधी)