नागपूर, करमाळीसाठी होळी विशेष ट्रेन
By Admin | Updated: February 14, 2015 04:02 IST2015-02-14T04:02:06+5:302015-02-14T04:02:06+5:30
मध्य रेल्वेकडून नागपूर आणि करमाळीसाठी होळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रेन सीएसटी आणि एलटीटीहून चालविण्यात येतील
_ns.jpg)
नागपूर, करमाळीसाठी होळी विशेष ट्रेन
मुंबई : मध्य रेल्वेकडून नागपूर आणि करमाळीसाठी होळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रेन सीएसटी आणि एलटीटीहून चालविण्यात येतील.
0१0१७ एलटीटी-नागपूर ट्रेन एलटीटीहून ५ मार्च रोजी 00.४५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.00 वाजता पोहोचेल. 0१0१८ ट्रेन नागपूरहून ५ मार्च रोजीच २१.१५ वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी १३.१0 वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापुर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा या ठिकाणी थांबा देण्यात येईल.
0१0२१ सीएसटी-करमाळी ट्रेन सीएसटीहून ५ आणि ७ मार्च रोजी सव्वा पाच वाजता सुटून करमाळी येथे त्याच दिवशी १६.३0 वाजता पोहोचेल. 0१0२२ ट्रेन ६ आणि ८ मार्च रोजी करमाळी येथून ७ वाजता सुटून सीएसटी येथे १७.५0 वाजता पोहोचेल.
या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. 0१0१७,0१0१८ आणि 0१0२१ ट्रेनचे आरक्षण १५ फेब्रुवारीपासून सुरु होत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.