शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कर्मचाऱ्यांनी केली परिपत्रकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या हिवताप व हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल फटींग, गडचिरोली जिल्हाध्यक्ष उद्धव डाबरे, उपाध्यक्ष तारकेश्वर अंबादे, सचिव अशोक नैताम, कोषाध्यक्ष अशोक पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक व आरोग्य पर्यवेक्षक उपस्थित होते.

ठळक मुद्देविभाग हस्तांतरणाला विरोध : हिवताप कार्यालयासमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निष्काळजीपणा व गैरप्रकार होत असल्याचे कारण दाखवून हिवताप व हत्तीरोग विभागातील सर्व आरोग्य कर्मचारी व तंत्रज्ञांना जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत हस्तांतरीत करण्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. या संदर्भात २२ नोव्हेंबर २०१९ रोजी काढलेल्या अन्यायकारक शासकीय परिपत्रकाची येथील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी होळी केली.राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या हिवताप व हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल फटींग, गडचिरोली जिल्हाध्यक्ष उद्धव डाबरे, उपाध्यक्ष तारकेश्वर अंबादे, सचिव अशोक नैताम, कोषाध्यक्ष अशोक पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक व आरोग्य पर्यवेक्षक उपस्थित होते. हिवताप निर्मूलन कार्यक्रम हा सन १९५५ पासून सुरू आहे. या विभागातील कर्मचारी मागील ५० वर्षांपासून कार्यरत असून ते नियमित सेवा देत आहे. मात्र शासनाने नवे परिपत्रक काढून कर्मचाºयांवर अन्याय केला आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.हिवताप व हत्तीरोग विभागातील अधिकाºयांनी निष्काळजीपणा व गैरप्रकार केल्याचे या परिपत्रकात नमूद आहे. यामध्ये कोणत्याही कर्मचाºयांच्या नावाचा उल्लेख नाही, असे असताना सुध्दा शासनाने जिल्ह्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाºयांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे केले आहे. हे कर्मचारी कपातीचे धोरण आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद