पाचोरा-वरखेडी रोडवर आग लागून कारची होळी
By Admin | Updated: March 12, 2017 18:37 IST2017-03-12T18:37:25+5:302017-03-12T18:37:25+5:30
सागर पाटील यांच्या मालकीची मारुती-८०० या धावत्या गाडीने पाचोरा-वरखेडी रोडवर पाचोऱ्याजवळ अचानक पेट घेतला

पाचोरा-वरखेडी रोडवर आग लागून कारची होळी
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 12 - शेंदुर्णी ता.जामनेर येथील सागर पाटील यांच्या मालकीची मारुती-८०० (एम.एच.१९ / एल.-२८१४) या धावत्या गाडीने पाचोरा-वरखेडी रोडवर पाचोऱ्याजवळ अचानक पेट घेतला. यावेळी गाडीमध्ये चालकासह तीन लोक होते ते लगेच बाहेर आल्याने सर्व सुखरूप आहेत.
१२ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास पाचोरा येथील गॅरेज मधून नुकतेच या मारुती-८०० चे तांत्रिक काम आटोपून चालक सागर नथ्थू माळी हा शेंदुणीला जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटर सायकल स्वारांनी चालक माळी यास सांगितले की गाडीने मागून पेट घेतलेला आहे. तेंव्हा चालकाने ताबडतोब गाडी थांबवून आपल्यासह गाडीत असलेल्या दोघानाही सुखरूप उतरविल्याने अनर्थ टळला. स्पार्किंग मुळे गाडी पेट घेतला असावा अशी चालकाने माहिती दिली.
या घटनेत पाचोऱ्याचा अग्नीशमन बंब येईलपर्यंत बघता-बघता गाडी पूर्ण जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे.