शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिवरेबाजारने सुरू केली प्रत्यक्ष शाळा; गाव कोरोनामुक्त झाल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 06:58 IST

मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामसभेचा पुढाकार . हिवरेबाजारने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती; मात्र शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही.

सुधीर लंकेलोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यात शासनाने अद्याप शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही; मात्र हिवरेबाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील पाचवी ते दहावीचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे. पहिलीचे वर्गही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हिवरेबाजारनेशाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती; मात्र शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही. शाळा बंद ठेवण्याचे धोरण असल्यामुळे अधिकारी जोखीम घेत नाहीत. त्यामुळे हिवरेबाजारच्या ग्रामसभेने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधत शाळा सुरू केली. अनेक पालकांचाच शाळा सुरू करण्याबाबत आग्रह होता. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुले शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली असल्याचे हिवरेबाजारचे उपसरपंच व राज्याच्या आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले. 

मुले आजारी असतील अथवा घरात कोणी आजारी असेल  तर मुलांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आलेले आहे. पाचवी ते सातवीच्या वर्गात १८२, तर आठवी ते दहावीच्या वर्गात ११२ विद्यार्थी असून उपस्थिती सुमारे शंभर टक्के दिसत आहे. दहावीची घेणार परीक्षादहावीच्या परीक्षा यावर्षी झाल्या नाहीत. हिवरेबाजारच्या माध्यमिक विद्यालयाने मात्र दहावीच्या मुलांना अकरावीत अडचण येऊ नये यासाठी त्यांची शाळेत चाळीस गुणांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा २५ जूनला होणार आहे. त्यामुळे मुले दहावीचा सराव करून मागील वर्षाची निदान उजळणी करतील हा गावाचा प्रयत्न आहे.  शिक्षकांना गाव न सोडण्याचे आवाहन हिवरेबाजारच्या प्राथमिक शाळेत सात शिक्षक आहेत. त्यापैकी चार शिक्षक गावात राहतात. उर्वरित शिक्षकांनीही गावाबाहेर न जाता त्यांना कोरोना काळात गावातच राहण्याचे आवाहन गावकरी करणार आहेत. तशी सुविधाही देणार आहेत.

असे आहेत नियम n शाळेत येताच मुलांची प्रथम दररोज आरोग्य तपासणी होते. त्यानंतर शारीरिक अंतर ठेवून मुलांना बसविले जाते. सकाळी १० ते १ या वेळेत वर्ग भरतात. n शाळेत जेवणाचे डबे आणू दिले जात नाहीत, तसेच मैदानावर खेळण्यास परवानगी नाही. n केवळ वर्गात बसायचे व त्यानंतर गावात कोठेही न थांबता थेट घरी जायचे अशी नियमावली आहे. 

मार्च २०२० पासून शाळा बंद असल्याने मुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाची परवानगी नसली तरी हिवरेबाजारने स्वत:च्या जोखमीवर शाळा सुरू केली आहे. कोणत्याही मुलाला काही शारीरिक त्रास झाला तर आजारपणाचा खर्च गाव उचलेल, अशी हमी आम्ही पालकांना दिली आहे.    - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष,     राज्य आदर्श गाव समिती.

टॅग्स :Hiware BazarहिवरेबाजारSchoolशाळा