युवकांमध्ये वाढतेयं एचआयव्ही
By Admin | Updated: August 11, 2014 23:01 IST2014-08-11T23:01:00+5:302014-08-11T23:01:00+5:30
आंतरराष्ट्रीय युवा दिन : तरूणांमध्ये जनजागृतीसाठी विशेष मोहीम

युवकांमध्ये वाढतेयं एचआयव्ही
बुलडाणा : पश्चीम वर्हाडात एचआयव्हीचे प्रमाण घटते असले तरी या पॉझीटिव्ह आढळणार्या रूग्णांमध्ये युवकांचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. गेल्या वर्षभरात तपासणी करण्यात आलेल्या १८ ते ३५ वर्ष वयोगटात सर्वाधीक रूग्ण हे अकोला जिल्ह्यात आढळून आले आहेत. युवा वर्ग हा एचआयव्ही-एडस् संदर्भात सर्वाधीक संवेदनशिल असल्याने युनायटेड नेशन संघटनेने आज १२ ऑक्टोबर रोजी सार्जया होणार्या आंतरराष्ट्रीय युवा दिनी 'जवा है जिंदगी : उत्तम भविष्याच्य वाटेवर' हे ब्रिद घेऊन युवकांमध्ये जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहे. या अंतर्गत युवकांसाठी विविध महाविद्यालयांमध्ये स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर पश्चिम वर्हाडातील एचआयव्ही चाचण्यांचा गोषवारा घेतला असता या तिन्ही जिल्ह्यात युवकांमध्ये एचआयव्हीची लागण सर्वाधीक असल्याचे दिसुन आले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अकोला, बुलडाणा व वाशीम या तिन जिल्ह्यांमध्ये ३५ हजार ७0५ रूग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये ३५ टक्के रूग्ण हे १८ ते ३५ वयोगटातील आहेत. यामध्ये ३४८ रूग्ण हे पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.
** गर्भवती मांतामध्ये प्रमाण कमी
तिन्ही जिल्ह्यांमध्ये गर्भवती मातांची तपासणी केली असता ३९ हजार १६१ मातांपैकी केवळ २९ मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये अकोला १७, बुलडाणा ७ व वाशीम मध्ये ५ मातांचा समावेश आहे.