साता-यातील तासवडे टोलनाक्यावर पत्रकाराला मारहाण
By Admin | Updated: May 20, 2017 16:47 IST2017-05-20T16:47:54+5:302017-05-20T16:47:54+5:30
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महमार्गावरील तासवडे टोलनाक्यावरील कर्मचारी एका कुटुंबाला मारहाण करत असतानाचे छायाचित्र घेणा-या पत्रकारास संबंधित कर्मचा-यांकडून मारहाण करण्यात आली.

साता-यातील तासवडे टोलनाक्यावर पत्रकाराला मारहाण
>आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 20 - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महमार्गावरील तासवडे टोलनाक्यावरील कर्मचारी एका कुटुंबाला मारहाण करत असतानाचे छायाचित्र घेणा-या पत्रकारासही संबंधित कर्मचा-यांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. प्रवीण कांबळे असे मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे.
काय आहे नेमकी घटना?
प्रवीण कांबळे शनिवारी दुपारी उंब्रजहून क-हाडकडे प्रवास करत असताना तासवडे टोलनाक्यावर एक टोलनाका कर्मचारी एका कुटुंबाला मारहाण करत होता. प्रवीण यांनी हा प्रकार पाहून घटनेचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी छायाचित्र काढण्यास विरोध करत संबंधित टोलनाका कर्मचा-यांनी कांबळे यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.
कांबळे यांचा मोबाइल काढून घेऊन त्यांना मारहाण करण्यात आली.
मारहाणीचा हा प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.