लातूरमध्ये RTI कार्यकर्त्याला मारहाण करणा-यांची शिवसेनेतून हकालापट्टी - आदित्य ठाकरे

By Admin | Updated: October 31, 2015 13:03 IST2015-10-31T13:00:39+5:302015-10-31T13:03:15+5:30

माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर हल्ला करणा-यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून जाहीर केले आहे.

Hitakatti - Aditya Thakre from Shiv Sena, assaulting RTI activist in Latur | लातूरमध्ये RTI कार्यकर्त्याला मारहाण करणा-यांची शिवसेनेतून हकालापट्टी - आदित्य ठाकरे

लातूरमध्ये RTI कार्यकर्त्याला मारहाण करणा-यांची शिवसेनेतून हकालापट्टी - आदित्य ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर हल्ला करणा-यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून जाहीर केले आहे. शाहू महाविद्यालयाच्या बांधकामाविरोधात आरटीआय अर्ज करून संस्थेला बदनाम केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शुक्रवारी माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर हल्ला केला. त्यांनाघरातून उचलून महाविद्यालयाच्या प्रांगणात नेत हजारो विद्यार्थ्यांसमोर त्यांच्यावर ऑईल ओतले तसेच लाथा, बुक्क्यांनी मारहाणही केली. शिवसेना कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे शहरात दहशत पसरली असून त्या पार्श्वभूमीवरच पक्षातून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
'लातूरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल मला समजले. या घटनेचा शिवसेना तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून या कृत्यात सहभागी असलेल्या लोकांना पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे' असे ट्विट ठाकरे यांनी केले आहे. 
लातुरातील आदर्श संस्था असलेल्या शाहू महाविद्यालयाशी काडीचाही संबंध नसणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे शहरात दहशत आहे. गुरुवारी भाईकट्टी यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालयाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे बसवेश्वर चौकात केलेले बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे नेते अभय साळुंके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन - तीन गाड्या घेऊन भाईकट्टी यांचे घर गाठून तुम्ही अनधिकृत बांधकामाविरोधात चांगले काम केल्याने तुमचा सत्कार करायचा असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या अंगावर ऑईल ओतून त्यांना बेल्ट, रॉड, हंटर आणि चेनने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात भाईकट्टी यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.  याप्रकरणी पोलिसांनी जबाब नोंदवून लातूर ग्रामीण पोलिसात शिवाजी भोसले यांच्यासह अन्य २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Web Title: Hitakatti - Aditya Thakre from Shiv Sena, assaulting RTI activist in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.