शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सरकारच्या निर्णयघाईला दणका! राज्यपालांनी ३ दिवसांतील सरकारी निर्णयांच्या फायली मागविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:33 IST

या तीन दिवसांत काढलेले जीआर, परिपत्रकेच नव्हे तर घेतलेल्या अन्य निर्णयांचीही माहिती मला द्यावी, असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने २२ जून ते २४ जून या तीन दिवसांत घेतलेल्या अनेक निर्णयांच्या फायली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागविल्या आहेत. संशयास्पद निर्णय घेण्यात आल्याच्या तक्रारीवर त्यांनी राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहिले आहे.या तीन दिवसांत अनेक संशयास्पद निर्णय विशिष्ट हेतूने घेण्यात आले. त्यामुळे ते तातडीने रद्द करावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली होती. कोरोनामुक्त होऊन इस्पितळातून परतताच त्या पत्राची दखल घेत राज्यपालांनी दणका दिला आहे.

निर्णयाची माहिती द्या!या तीन दिवसांत काढलेले जीआर, परिपत्रकेच नव्हे तर घेतलेल्या अन्य निर्णयांचीही माहिती मला द्यावी, असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे. राज्यपालांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यपालांनी तीन दिवसांतील निर्णयांची तर माहिती घ्यावीच, शिवाय २१ जूनपासून घेण्यात आलेल्या सर्व निर्णयदेखील तपासावेत.

‘त्या’ १२ जणांची यादी रद्द होणार!राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळे सरकार आले तर महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी केलेली शिफारस रद्द होईल. नवीन सरकारकडून नव्याने नावे पाठविली जातील.

शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे-पाटील, विजय कारंजकर आणि चंद्रकात रघुवंशी अशी नावे दिली होती. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि संगीतकार आनंद शिंदे यांची नावे होती. काँग्रेसतर्फे प्रवक्ते सचिन सावंत, गायक अनिरुद्ध वनकर, मुजफ्फर हुसेन आणि रजनी पाटील यांची नावे देण्यात आली होती.

यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे हे अलीकडेच विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. रजनी पाटील यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठविले आहे तर राजू शेट्टी यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपले नाव त्या यादीतून वगळा, अशी मागणी केली होती.

७ नोव्हेंबर २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारकडून ही नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी या नावांना नियुक्ती दिली नाही. १२ जणांच्या यादीत तीन पक्षांची प्रत्येकी चार नावे होती. यावरून अनेकदा वाद निर्माण झाला आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी