हिट अॅंन्ड रन : सलमानची हिरॉइनही त्याच्याच वाटेवर
By Admin | Updated: February 28, 2017 15:43 IST2017-02-28T15:23:49+5:302017-02-28T15:43:47+5:30
अभिनेता सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया'पासून कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री सलमानप्रमाणेच हिट अॅंन्ड रन प्रकरणामुळे चर्चेत

हिट अॅंन्ड रन : सलमानची हिरॉइनही त्याच्याच वाटेवर
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - अभिनेता सलमान खानसोबत ''मैंने प्यार किया''पासून कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री सलमानप्रमाणेच हिट अॅंन्ड रन प्रकरणामुळे चर्चेत आहे.
2016 मध्ये झालेल्या एका अपघाताप्रकरणी भाग्यश्री विरोधात FIR दाखल झाली होती. संथ गतीने या अपघाताची चौकशी सुरू होती. मात्र, आता याप्रकरणी वेगळं वळण आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गाडी मी चालवत नव्हती तर माझा चालक चालवत होता असं स्टेटमेंट भाग्यश्रीने दिलं आहे.
याउलट तक्रारकर्त्याकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये गाडी भाग्यश्री चालवत होती असं म्हटलं आहे. ''2 नोव्हेबर 2016 रोजी लिंक रोडच्या दिशेने जात असताना मी सांताक्रूझच्या सिग्नलवर थांबलो असताना मागून सुसाट आलेल्या स्कोडाने माझ्या गाडीला ठोकर दिली आणि मी जखमी झालो. गाडी भाग्यश्री चालवत होती हे मी पाहिलं''. रूग्णालयात असताना भाग्यश्रीचे पती विचारपुस करायला आले असता त्यांनीही गाडी भाग्यश्री चालवत होती असं म्हटलं पण तक्रार न करण्यास सांगितलं. त्यानंतर आम्हाला फसवण्यात येत असून ब्लॅकमेल केलं जात असल्याचं भाग्यश्रीचे पती म्हणाले होते.
तर आता, गाडी मी चालवत नव्हती माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता असं भाग्यश्रीने म्हटलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणती वळणं घेतं हे आता पाहायचं आहे.