हिट अॅण्ड रन : सलमानला सुप्रीम कोर्टात खेचणार
By Admin | Updated: December 24, 2015 02:44 IST2015-12-24T02:44:31+5:302015-12-24T02:44:31+5:30
‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी अभिनेता सलमान खानला हायकोर्टाने निर्दोष सोडले असले, तरी या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.

हिट अॅण्ड रन : सलमानला सुप्रीम कोर्टात खेचणार
सरकारची हायकोर्टात माहिती
मुंबई : ‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी अभिनेता सलमान खानला हायकोर्टाने निर्दोष सोडले असले, तरी या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सलमानच्या खटल्यासंदर्भात केलेल्या जनहित याचिकेवरील सोमवारच्या सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने याप्रकरणी ढिसाळ तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, अशी विचारणा राज्य सरकारकडे केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी राज्य सरकारने सलमानच्या सुटकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगितले. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात ‘स्पेशल लीव्ह पिटिशन’ (एसएलपी) दाखल करणार असल्याचेही अॅड. वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिल्यानंतरच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत विचार केला जाईल, असेही अॅड. वग्यानी यांनी खंडपीठासमोर स्पष्ट केले.