हिट अँड रन प्रकरण - साक्षीदाराने पटवली सलमानची ओळख
By Admin | Updated: May 6, 2014 16:44 IST2014-05-06T16:33:34+5:302014-05-06T16:44:36+5:30
वांद्रे येथे १२ वर्षांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली त्यावेळी सलमानच गाडी चालवत होता अशी साक्ष एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिली.

हिट अँड रन प्रकरण - साक्षीदाराने पटवली सलमानची ओळख
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ६ - वांद्रे येथे १२ वर्षांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली त्यावेळी सलमानच गाडी चालवत होता अशी साक्ष एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने मंगळवारी दिल्याने अभिनेता सलमान खान समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
२००२ साली पदपथावर झोपलेल्या व्यक्तींना चिरडल्याचा आरोप सलमानवर ठेवण्यात आला असून त्यात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. त्यामुळे सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची प्रकरणाची नव्याने सुनावणी सुरू झाली असून सुरुवात झाली. मंगळवारी सलमान कोर्टात हजर झाल्यानंतर त्याची ओळख परेड झाली व दोन साक्षीदारांनी त्याची ओळख पटवली व आपली साक्षही नोंदवली.