व्हिक्टोरिया इतिहासजमा होणार
By Admin | Updated: June 8, 2015 20:09 IST2015-06-08T18:39:52+5:302015-06-08T20:09:37+5:30
दक्षिण मुंबईत असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाड्यांची सफर करण्याची मजा आता मुंबईकरांसह या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना घेता येणार नाही.

व्हिक्टोरिया इतिहासजमा होणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०६ - दक्षिण मुंबईत असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाड्यांची सफर करण्याची मजा आता मुंबईकरांसह या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना घेता येणार नाही. व्हिक्टोरिया घोडागाड्या बंद करण्याबाबतची याचिका बर्ड अॅन्ड अॅनिमल ट्रस्ट आणि काही स्वंयसेवी संस्थानी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने एक वर्षाच्या कालावधीत बंद करण्याचा आदेश दिला आहे.
मुंबई हायकोर्टात न्यायाधिश ए.एस.ओका आणि ए.के.मेनन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी घोड्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने योजना आखावी आणि एक वर्षाच्या कालावधीत व्हिक्टोरिया घोडागाड्या बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या किनारपट्टीवर रपेट करण्या-या घोडागाड्यासुद्धा बंद करण्याचे सुनावणीत म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयाला व्हिक्टोरिया घोडागाडी मालकांनी विरोध दर्शविला आहे.