शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग चित्रकार चेतनने रचला फ्रान्समध्ये इतिहास; एबीलिंपिक्स स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 06:29 IST

चेतनने आपल्या कल्पकतेला व्यक्त करण्यासाठी हातात ब्रश घेतला आणि सृजनशील कलाकृती साकारल्या.

पाली : सुधागड तालुक्यातील तळई गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. रविवारी फ्रान्समध्ये झालेल्या दहाव्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली असून, ४० वर्षांत पहिल्यांदाच भारतालासुवर्ण पदक मिळाले आहे.

चेतनने आपल्या कल्पकतेला व्यक्त करण्यासाठी हातात ब्रश घेतला आणि सृजनशील कलाकृती साकारल्या. चेतनने आतापर्यंत १०५ हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. त्यामध्ये १० सुवर्ण पदके, २६ इतर पदके, ३० चषक आणि ११५ हून अधिक प्रमाणपत्रांचा समावेश आहे. २०१८ मध्ये राष्ट्रीय एबीलिंपिक्स या दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये  चेतनला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. त्याने त्याची काही चित्रे एनएसजी कमांडोंना समर्पित केली आहेत. 

चेतन पाशिलकरचा थक्क करणारा प्रवास

श्रवण दोषामुळे त्याचे शिक्षण शारीरिकदृष्ट्या आव्हान असलेल्या मुलांच्या शाळेमध्ये आहे. तेथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्वतःचे भाव चित्रकलेतून व्यक्त करण्याचा त्याला मार्ग सापडला. त्यानंतर चित्रकला हे त्याच्या भावनेचे माध्यम बनले. जी.डी. आर्ट डिप्लोमा आणि बीएफए पेंटिंगचे पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून त्याने एम.एफ.ए. चित्रकला पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली.

टॅग्स :IndiaभारतGold medalसुवर्ण पदक