शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018: सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प- रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:33 IST

सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असून त्यामध्ये शेती, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मिती यावर भर देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.

मुंबई-  सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असून त्यामध्ये शेती, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मिती यावर भर देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केली. देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन केलं.

शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव, दहा कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आरोग्य उपचारांसाठी तरतूद असलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना, शेती – ग्रामीण पायाभूत सुविधा - आरोग्य सुविधा अशा विविध प्रकारे ग्रामीण क्षेत्रासाठी विविध खात्यांमार्फत एकूण साडेचौदा लाख कोटींची तरतूद, तरुणांना रोजगार निर्मितीस मदत करण्यासाठी मुद्रा योजनेत यंदा तीन लाख कोटी रुपयांची भरघोस तरतूद, सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद अशी अनेक वैशिष्ट्ये या ऐतिहासिक अर्थसंकल्पाची आहेत. गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठीचे उद्दीष्ट वाढवून आता आठ कोटी करण्यात आले आहे. छोटे आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले आहे. समाजाच्या सर्व घटकांचा विचार करतानाच देशाचा आर्थिक विकास गतीने होईल याचीही काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होतानाच सर्वसामान्य माणसाला त्यामध्ये महत्त्वाचे स्थान देणारा आणि विकासाच्या संधी मिळवून देणारा हा अर्थसंकल्प आहे, असं प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Raosaheb Danweरावसाहेब दानवेBudgetअर्थसंकल्पBJPभाजपा