शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:06 IST

Vijay Wadettiwar : लंडनहून येणारी वाघनखे ही छत्रपती शिवरायांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही लवकरच लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करणार आहे. परंतु, लंडनहून येणारी वाघनखे ही छत्रपती शिवरायांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडूनही पुष्टी करण्यात आल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  

विजय वडेट्टीवार म्हणाले की, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने जे पत्र पाठवले आहे, त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. ती वाघनखं ओरिजनल आहेत का? या संदर्भात आम्ही माहिती देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. गाजावाजा करून वाघनखांच्यासंदर्भात जी भूमिका मांडली, त्याला या पत्रामुळे धक्का बसला आहे. तसेच, या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या सरकारने दिखाऊपणा केलेला आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चाललेल्या लोकांच्या भावनेशी सरकार खेळत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

इंद्रजीत सावंत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची वाघनखं घेऊन येणार, असा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र ते संग्रहालय स्वतः सांगत आहे की, ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अधिकारी करारासाठी गेले होते, तेव्हाही त्यांनाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ही वाघनखं शिवरायांची नाहीत. तसेच, संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितली आहे. तुम्ही ही वाघनखे भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात वाघनखे ठेवणार आहे, तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. याविषयी साशंकता असल्याचे स्पष्ट करावे, असे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पत्रात लिहिले असल्याचे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज