अल्पवयीन विवाहितेवर हिंगोलीत बलात्कार
By Admin | Updated: April 29, 2017 02:23 IST2017-04-29T02:23:59+5:302017-04-29T02:23:59+5:30
सासरच्या नातेवाइकांना मारहाण करून येथील एका अल्पवयीन विवाहितेला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन विवाहितेवर हिंगोलीत बलात्कार
वसमत (जि. हिंगोली) : सासरच्या नातेवाइकांना मारहाण करून येथील एका अल्पवयीन विवाहितेला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील १७ वर्षीय पीडित मुलीस तिचे सासू-सासरे व नवऱ्यासमोर मारहाण करून २७ एप्रिल रोजी शेख इरफान शेख खाजा (२१), शेख नवशाद शेख खाजा, शेख खाजा, शेख इम्रान (सर्व रा.बुखारी तखिया वसमत) यांनी दुचाकीवर बसवून पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून शेख इरफान शेख खाजाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. १६ जानेवारी २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. कधी त्याच्या राहत्या घरी, तर कधी त्याच्या आजीच्या घरी, रेल्वे स्थानकावर त्याने तिच्याशी कुकर्म केल्याची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे. याकामी त्याला मदत करून, तसेच वाईट नजेरेने पाहून शेख खाजा व शेख इम्रान यांनीही तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)