हिंगोली: चिंचोली फाट्याजवळ ५ लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: June 8, 2017 17:44 IST2017-06-08T17:34:18+5:302017-06-08T17:44:54+5:30
तालुक्यातील सिरसम-हिंगोली चिंचोली फाट्याजवळ ५ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई बासंबा पोलिसांनी ८ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास केली.

हिंगोली: चिंचोली फाट्याजवळ ५ लाखांचा गुटखा जप्त
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 8 - तालुक्यातील सिरसम-हिंगोली चिंचोली फाट्याजवळ ५ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई बासंबा पोलिसांनी ८ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास केली. जिल्ह्यात छुप्या पद्धतीने सर्रासपणे गुटखाविक्री होत आहे. शहरासह
ग्रामीण भागात गुटख्याचा पुरवठा करणाºयांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. ८ जून रोजी सिरसम-हिंगोली रस्त्यावरून एमएच ३८ - ई- २३१७ या वाहनांतून गुटखा नेला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा कारवाई करून वाहनास चिंचोली फाट्याजवळ अडविले. यावेळी वाहनांतून जवळपास साडेचार ते पाच लाखांचा गुटख जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वाहनचालक मिलींद पाईकराव यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सदर कारवाई सपोउपनि मगन पवार, एन. आर. राठोड, जगण पवार, माघाडे, वाढवे आदींनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.