हिंगोलीत ५० विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा
By Admin | Updated: April 11, 2015 16:23 IST2015-04-11T16:21:34+5:302015-04-11T16:23:28+5:30
हिंगोलीतील समगा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना खिचडी खाल्याने विषबाधा झाली असून ५० विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंगोलीत ५० विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. ११ -हिंगोलीतील समगा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना खिचडी खाल्याने विषबाधा झाली आहे. यामुळे सुमारे ५० विद्यार्थी आजारी पडले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितिनुसार विद्यार्थ्यांना जी खिचडी देण्यात आली त्यात मेलेली पाल आढळली होती. शनिवारी सकाळी खिचडी खाल्यानंतर काही मुलांना मळमळण्याचा त्रास होऊ लागला आणि त्याची प्रकृती बिघडली. शिक्षकांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवले. मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातील अधिका-यांनी सांगितले.