हिंदू राष्ट्राचे स्वप्न हे भंगणारे - डॉ. सबनीस
By Admin | Updated: February 7, 2016 01:18 IST2016-02-07T01:18:25+5:302016-02-07T01:18:25+5:30
समाजात साडेतीन टक्के ब्राम्हण असल्याचे सांगितले जात आहे, मात्र ब्राम्हण सगळ्या जातींमध्ये आहेत, त्यामुळे एक जातीयवाद दुसरा जातीयवाद असा फरक आपण करू शकत नाही

हिंदू राष्ट्राचे स्वप्न हे भंगणारे - डॉ. सबनीस
पुणे : समाजात साडेतीन टक्के ब्राम्हण असल्याचे सांगितले जात आहे, मात्र ब्राम्हण सगळ्या जातींमध्ये आहेत, त्यामुळे एक जातीयवाद दुसरा जातीयवाद असा फरक आपण करू शकत नाही, हा सगळा देश ब्राम्हणांचा आहे, एकाच जातीला टार्गेट करता येणार नसल्याचे सांगत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी हिंदू राष्ट्राचे स्वप्न हे भंगणारे असल्याचे परखड बोल सत्ताधाऱ्यांना सुनावले.
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने अनंत गाडगीळ यांच्या हस्ते डॉ. सबनीस यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत’ या
विषयावर विचार व्यक्त करताना ते बोलत होते.
याप्रसंगी विनायक गाडगीळ उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी ‘न्यायव्यवस्थेतील गैरसमज’ यावर विचार व्यक्त केले. न्यायालयापुढे सत्य येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात आणि दोष न्यायालयाला दिला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)