पौंगडावस्थेच होतेय ‘एचआयव्ही’ची बाधा

By Admin | Updated: December 1, 2014 11:02 IST2014-12-01T11:02:44+5:302014-12-01T11:02:44+5:30

किशोरवयीन/ पौंगडावस्थेतील मुलांना एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे. १५ ते २९ वयोगटातील ३१ टक्के मुलांमध्ये या विषाणूंचा प्रार्दुभाव होताना दिसत आहे,

The hindrance of 'HIV' | पौंगडावस्थेच होतेय ‘एचआयव्ही’ची बाधा

पौंगडावस्थेच होतेय ‘एचआयव्ही’ची बाधा

पूजा दामले, मुंबई
मुंबई : एचआयव्ही एड्सची बाधा होण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्यभरात जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तरीही प्रत्यक्षात किशोरवयीन/ पौंगडावस्थेतील मुलांना एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे. १५ ते २९ वयोगटातील ३१ टक्के मुलांमध्ये या विषाणूंचा प्रार्दुभाव होताना दिसत आहे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एड्स हा पूर्णत: कधीच बरा होऊ न शकणारा आजार आहे. तसेच हा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. लहान वयातच हा आजार जडला, तर त्यांच्या भविष्यावर याचा विपरित परिणाम होणार हे निश्चितच. एचआयव्ही बाधित असणाऱ्या रुग्णांपैकी ८८.७ टक्के रुग्ण हे आधी १५ ते ४९ या वयोगटातील होती. मात्र, आता हे वय कमी होत आहे. एचआयव्ही बाधित होण्याचे प्रमुख कारण असुरक्षित शरीर संबंध हेच आहे, म्हणूनच याविषयी तरुणाईमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, स्वेच्छा रक्तदान मोहिमेमुळे रक्ताद्वारे एचआयव्हीचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचेही दिसून आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेद्वारे १९८८ सालापासून १ डिसेंबर ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून साजरा केला जातो. एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २०१० ते २०१५ या पाच वर्षांची संकल्पना ‘शून्य गाठायचे आहे’ अशी आहे. शून्य नवीन एचआयव्ही संसर्ग, शून्य भेदभाव आणि एड्समुळे होणारे शून मृत्यू हे ३ शून्य गाठायचे आहेत.

एच.आय.व्ही. ची
बाधा होण्याची कारणे
असुरक्षित शरीर संबंध
बाधित सिरिंज, सुई
बाधित रक्त
मातेकडून बाळाला
------------
एचआयव्ही बाधित रुग्णाला देण्यात येणारा प्रथम स्तरावरील एआरटी उपचार असफल ठरतो. त्यावेळी त्याला द्वितीय स्तरावरील (सेकंड लाईन एआरटी) उपचार पद्धतीचा वापर केला जातो. हे उपचार घेण्यासाठी रुग्णांना दरमहा जे.जे. रुग्णालयात यावे लागते.

ए.आर.टी. सेंटर
अ‍ॅटीरिट्रोव्हायरल थेरपी म्हणजेच ए.आर.टी. ही थेरपी ज्या ठिकाणी दिली जाते त्याला ए.आर.टी. सेंटर असे म्हटले जाते. व्यक्तीचा रक्ततपासणी अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यास तत्काळ त्या व्यक्तीला एड्सची बाधा झाली आहे, असे निदान करता येत नाही. त्या व्यक्तीच्या पुन्हा सहा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.

या तपासण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीला एच.आय.व्ही एड्स असल्याचे निदान केले जाते. या व्यक्तीचा सीडी ४ काऊंट हा ३५० च्या खाली असल्यास त्या व्यक्तीला ए.आर.टी सेंटरमध्ये जाण्याचा
सल्ला दिला जातो. या सेंटरमध्ये त्या व्यक्तीला औषधे दिली जातात. यानंतर त्या व्यक्तीला प्रत्येक तीन महिन्यांनी या सेंटरमध्ये तपासणी आणि औषधे घेण्यासाठी यावे लागते.

एआरटी केंद्रात
दिली जाणारी औषधे
काळजी आणि आधार केंद्रांमध्ये कोणत्या सेवा प्रदान केल्या जातात?
> समुपदेशन
> विविध गटांसह नियंत्रकालिक संमेलने
> बाह्यभेटी कार्यकर्ता
> समर्थन
> इतर उपक्रम

एआरटीचे उपचार घेण्यातील सातत्य वाढविणे, प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करणे या उद्देशाने आणि मुख्य एआरटी केंद्राचा भार कमी करणे यासाठी नवी दिल्लीच्या नॅकोच्या अधिपत्याखाली महाराज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यात ३१ जिल्ह्यांत एकूण १४० लिंक एआरटी केंद्रे स्थापन केलेली आहेत.

Web Title: The hindrance of 'HIV'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.