शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:38 IST

Raj Thackeray Uddhav Thackeray News: त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही असं राज यांनी सांगितले.

मुंबई - राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ६ जुलैला सरकारच्या या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठीचा अजेंडा असेल असं सांगत राज यांनी सर्व राजकीय पक्ष, मराठी कलावंत, साहित्यिक यांना मोर्चात येण्याचं आवाहन केले आहे. त्यात या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसेल अशा प्रकारचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले आहेत. 

या मोर्चाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला विरोध केल्याचे सांगत ते या मोर्चात येतील का असं विचारले. पत्रकारांच्या या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले तर तेदेखील त्यात आले. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्या नेत्यांशी बोलणार. आमची माणसे त्यांच्या लोकांशी बोलतील. ज्या विधानावरून जे सगळं चाललेय ते विधान तुम्हाला आठवत असेल, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला ६ तारखेला कळेल असं राज यांनी म्हटले. 

तसेच रविवार यासाठी आहे जेणेकरून सगळ्यांना येणे सोपे जाईल. महाराष्ट्राची ताकदही त्यातून सरकारला दिसेल. रविवार आहे शाळा बंद असतात, पालकांना-विद्यार्थ्यांना यायला सोपे आहे. त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही. राज्यांवर ही गोष्ट सोपवलेली नसताना राज्य सरकार हिंदी भाषा का आणतेय हे कळत नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी सीबीएसई शाळा राज्यात आणल्या होत्या. मात्र आता या शाळा राज्यांतील शाळांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतेय. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंचाही सरकारला इशारा

दरम्यान, महाराष्ट्रावर हुकूमशाही लादण्यासाठी शिवसेना संपवली हे दिसून आली. कुठल्याही भाषेचा द्वेष नाही. जे आंदोलन उभे राहील त्यामागे शिवसेना खंबीरपणे उभे राहील. हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि राहणारच...हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी बॉलिवूड उभे राहिले. आम्हाला हिंदीचे वावडे नाही परंतु हिंदी सक्तीमागे छुपा अजेंडा आहे. कालांतराने देशात एकच पक्ष राहील त्यादिशेने ही वाटचाल सुरू आहे. सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जातेय त्याचा विरोध आम्ही करणारच आहोत. बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे गद्दारांना कळायला हवे. हिंदी सक्ती नको म्हणजे नको, हिंदी शिकली नाही तरी ती येते. ही सक्ती आम्ही मान्य करणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेhindiहिंदीmarathiमराठीMorchaमोर्चा