शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाकडून हिंदी शिष्यवृत्ती स्थगित : सर्व महाविद्यालयांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:09 IST

केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती स्थगित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती व विद्यावेतनामध्ये कपात केली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी हिंदी भाषेच्या पुरस्कार केवळ दिखाऊ 

पुणे : केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती स्थगित करण्यात आली असून त्याबाबतचे अर्ज स्वीकारू नयेत असे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाकडून एकापाठोपाठ एक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व विद्यावेतनामध्ये कपात केली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे.केंद्र शासनाकडून दिली जाणारी अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मुल्यांकन अभ्यास सुरू असल्याने पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारू नयेत. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण संचलनालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत याबाबतचे कुठलेही अर्ज स्वीकारू नयेत अथवा उच्च शिक्षण संचलनालयाकडे पाठवू नयेत असे परिपत्रक उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी काढले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांना याबाबतच्या सुचना देण्यात आल्या  आहेत. या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून वर्षानुवर्षे दिली जाणारी हिंदी शिष्यवृत्ती अचानक स्थगित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. विद्यापीठाच्या हिंदी विभागातील विद्यार्थी महावीर साबळे यांनी सांगितले, हिंदी शिष्यवृत्ती योजनेचे मुल्यांकन करायला काहीच हरकत नाही, मात्र त्यासाठी अर्ज स्वीकारणे बंद करणे चुकीचे आहे. यामागे केंद्र शासनाचा ही शिष्यवृत्ती योजना बंद करण्याचा हेतू असल्याचे दिसून येते.’’केंद्र शासनाकडून नेट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी जीआरएफ शिष्यवृत्तीच्या संख्येत कपात केली. त्याचबरोबर पीएच.डी व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यासाठी विद्यापीठांना दिले जाणारे अनुदान युजीसीकडून बंद करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून सातत्याने विद्यार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेतले जात असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ............................हिंदी भाषेच्या पुरस्कार केवळ दिखाऊ केंद्र शासनाकडून हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचवेळी अचानक अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त हिंदी भाषा शिकावी यासाठी प्रोत्साहनपर दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद केल्याने केंद्र शासनाकडून हिंदी भाषेच्या पुरस्काराचे उपक्रम केवळ दिखावू आहेत का अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीhindiहिंदीCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार