शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 07:08 IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: राज्यात हिंदी भाषेवरून चांगलेच राजकारण तापले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जे जनतेच्या मनात आहे ते होऊ नये आणि मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये यासाठी काही जण हॉटेलमध्ये गाठीभेटी घेत आहेत. आमचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. जे जनतेच्या, राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वर्धापन दिन मेळाव्यात केले.  हिंदी सक्ती करून बघा. अंगावर येणार असाल तर मी उभा आहे. कम ऑन किल मी. पण, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल; परंतु, जाताना आडवे व्हाल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी ठाकरे यांनी मनसेशी युती करण्याचे संकेत दिले.     जे तुमच्या, महाराष्ट्राच्या मनात ते करायला तयार- उद्धव ठाकरेमुंबई महापालिका निवडणुकीसाठी  आम्ही तयार आहोत. जे तुमच्या, महाराष्ट्राच्या मनात आहे ते करायला तयार आहे, असे ते म्हणाले.  काहीही झाले तरी मुंबई त्यांच्या हाती देणार नाही. शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचे प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशान पुसून टाकू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंचा पलटवारमाणसाचे दिवस कधी बदलतील सांगू शकत नाही, सत्तेत होते तेव्हा सगळ्यांना कस्पटासमान समजणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे, माझ्याशी युती करता का म्हणून आज ते किती अगतिक, उतावीळ आणि लाचार झाले आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

मरे हुए को क्या मारना है- एकनाथ शिंदेपक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरेंना प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, ते म्हणाले कम ऑन किल मी, पण मरे हुए को क्या मारना है, महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला आहे. मारायला आलात तर ॲम्बुलन्स घेऊन या असेही म्हणाले, पण नुसता करून शोर मनगटात येत नाही जोर, वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला शेर का कलेजा लागतो.

विधानसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नकास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणून लढायच्या असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.  उबाठाचे मुंबईतील ५० नगरसेवक व इतर पक्षाचे मिळून ६५ माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. तुम्ही निडणुकीच्या कामाला लागा. विधानसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, प्रत्येक निवडणूक जिंकायची, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र