तिच्यासाठी 'तो' करतोय सलग 100 तास बॅटिंगचा विश्वविक्रम
By Admin | Updated: January 6, 2017 15:16 IST2017-01-06T15:02:40+5:302017-01-06T15:16:05+5:30
पेणंद आदिवासी पाड्यातल्या मुलींच्या शिक्षणासाठी मुकूंद गावडे हा तरूण शिवाजी पार्कात सलग १०० तास बँटिंग करणार आहे

तिच्यासाठी 'तो' करतोय सलग 100 तास बॅटिंगचा विश्वविक्रम
>प्रवीण दाभोळकर / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - १०० तास... तो सलग खेळणार... तो विश्वविक्रम करणार... आपल्यातलाच आहे तो... पण तो आपल्याहुन वेगळा ठरणार.. कारण तो फक्त स्वतः साठी नाही खेळणार... तो खेळणार त्या आदिवासी पाड्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी... पेणंद आदिवासी पाड्यातल्या मुलींच्या शिक्षणासाठी मुकूंद गावडे हा तरूण शिवाजी पार्कात सलग १०० तास बँटिंग करणार आहे. ज्यांना शिक्षणासारख्या मुलभुत सुविधा सुद्धा मिळत नाही आहेत, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी ही कामगिरी पार पाडण्याचा ध्यास मुकुंद गावडे आणि समन्वय या सामाजिक संस्थेने घेतला आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता त्याने हा विश्वविक्रम करण्यास सुरुवातदेखील केली आहे.
त्याला बाँलिंग करणारे बाँलर्सही दिवस रात्र एक करत आळीपाळीने बाँलिंग करत आहेत. कोणत्याच प्रकारचा ताण, थकवा त्याच्या चेह-यावर दिसत नाही आहे. मुकूंद गावडे विश्वविक्रम करायच्या तयारीत आहे आणि सोबत सामाजिक बांधिलकीही जपतोय हे विशेष. प्रंचड इच्छाशक्ती, अंगमेहनत, पूर्वतयारी, खर्च लागला आहे यासाठी.
मुकूंद हा किर्ती महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. तो काळाचौकीत राहतो. शिवाजी पार्कात एकीकडे तो विश्वविक्रम करत असताना जवळच समन्वय संस्थेचे कार्यकर्ते येणा जाणा-या तसंच तिथे जमणा-या लोकांना संस्थेची माहिती देत मदत करण्याचं आवाहन करत आहेत. या माध्यमातून येणारा सर्व निधी समन्वय संस्थेला दिला जाणार आहे. आदिवासी मूलांच्या शिक्षणासाठी मुकूंद गावडेने उचललेलं हे पाऊल नक्कीच स्तुत्य आहे.