प्रकल्प संचालकावर अपहाराचा गुन्हा

By Admin | Updated: October 31, 2015 02:27 IST2015-10-31T02:27:01+5:302015-10-31T02:27:01+5:30

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील कर्ज प्रकरणासाठी दाखल प्रस्तावांतील कागदात्रांमध्ये हेराफेरी करून तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांचा

Hijacking Offense on Project Director | प्रकल्प संचालकावर अपहाराचा गुन्हा

प्रकल्प संचालकावर अपहाराचा गुन्हा

उस्मानाबाद : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील कर्ज प्रकरणासाठी दाखल प्रस्तावांतील कागदात्रांमध्ये हेराफेरी करून तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे़ तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक व पुणे येथील प्रकल्प संचालक शरद आऱ नाईक यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या उस्मानाबाद येथील जिल्हा व्यवस्थापक शैलजा काळे यांना वरिष्ठ स्तरावरून वाटप झालेल्या कर्जाची वसुली करण्याच्या सूचना आल्या होत्या़ वरिष्ठांच्या सूचनेनुसार काळे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे जाऊन लाभार्थी असलेले जालिंदर चव्हाण, प्रभाकर चव्हाण, तुकाराम जाधव, तुळजाराम जाधव, रामराव जाधव, श्यामराव होगले व तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील विश्वनाथ खटके, किसन खटके यांची चौकशी केली़ त्यात ते गावात राहत नसल्याचे समोर आले़
काही ग्रामपंचायतींनी ते गावात राहत नसल्याचे पत्रही काळे यांना दिले़ त्यानंतर शैलजा काळे यांनी संबंधित लाभार्थ्यांची अधिक चौकशी केली असता महामंडळाकडे दाखल झालेल्या प्रस्तावातील कागदपत्रांची हेराफेरी करून कर्जप्रकरणे मंजूर करून आठ जणांच्या नावे कर्ज उचलल्याचे समोर आले़ लाभार्थ्यांनी महामंडळाचे कर्ज मंजूर व्हावे, यासाठी सेक्युरिटी चेकसह कागदपत्रांसह प्रस्ताव महामंडळाकडे दाखल केले होते़
काळे यांनी लातूर येथील प्रकल्प अधिकारी एचक़े. राके यांच्याकडे अहवाल दिला़ तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक व पुणे येथील प्रकल्प संचालक शरद आऱ नाईक यांच्याविरुद्ध फिर्याद दिली़

Web Title: Hijacking Offense on Project Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.