जावयाचे अपहरण; सासू-सासरा अटकेत
By Admin | Updated: September 1, 2014 01:53 IST2014-09-01T01:53:56+5:302014-09-01T01:53:56+5:30
पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीला आलेल्या जावयाचे अपहरण केल्याप्रकरणी सासू-सासऱ्याला करकंब पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली

जावयाचे अपहरण; सासू-सासरा अटकेत
पंढरपूर : पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीला आलेल्या जावयाचे अपहरण केल्याप्रकरणी सासू-सासऱ्याला करकंब पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. याआधी चौघांना अटक झाली असून, ते पोलीस कोठडीत आहेत. नितीन माळी (पुणे) हे त्यांची पत्नी प्रियंका (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) हिला नेण्यासाठी आले होते. सासरच्या लोकांनी प्रियंकाला त्यांच्यासोबत पाठविले नाही. तेव्हापासून नितीन बेपत्ता झाल्याने सासरच्यांनी नितीनचे अपहरण केल्याची तक्रार मुलाची आई मुद्रका माळी यांनी करकंब पोलीस ठाण्यात दिली. (प्रतिनिधी)