अपहृत मुलीची रायपूरहून सुटका
By Admin | Updated: November 21, 2014 02:19 IST2014-11-21T02:19:26+5:302014-11-21T02:19:26+5:30
ब्रह्मपुरी येथून बुधवारी अपहरण झालेल्या शिवानी गजबे (४) हिची छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकावरून गुरुवारी पोलिसांनी सुखरूप सुटका केली़

अपहृत मुलीची रायपूरहून सुटका
चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथून बुधवारी अपहरण झालेल्या शिवानी गजबे (४) हिची छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकावरून गुरुवारी पोलिसांनी सुखरूप सुटका केली़ कबिंद्र लाजपतसिंग ठाकूर (२३) व अमित दिलीप थापा (२०) या दोन अपहरणकर्त्यांना अटक केली असून, यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.
ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात शिवानी के.जी.मध्ये शिकते़ कबिंद्र हा अपहृत मुलीच्या घरी नेहमी येत असे. त्यामुळे शाळा सुटल्यावर त्याच्यासोबत ती सहज गेली. कबिंद्रने तिला गडचिरोलीच्या देसाईगंज येथे नेले. त्यानंतर त्याने अमित थापा कडे तिला दिले व रेल्वेने दोघेही गोंदियाकडे रवाना झाले होते, असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्यावर कुणाचाही संशय येऊ नये, यासाठी कबिंद्र देसाईगंज येथे फिरत होता. सायंकाळी ६ वाजता मुलगी गोंदिया येथे पोहोचली. तेव्हा कबिंद्रला पोलिसांनी देसाईगंज येथे अटक केली. (प्रतिनिधी)