स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव पुणे, मुंबईत!

By Admin | Updated: March 24, 2015 01:17 IST2015-03-24T01:17:59+5:302015-03-24T01:17:59+5:30

स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या भागात आहे, याची पाहणी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने मॅपिंग केले. त्यात पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे.

The highest incidence of swine flu in Pune, Mumbai | स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव पुणे, मुंबईत!

स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव पुणे, मुंबईत!

पुणे : स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या भागात आहे, याची पाहणी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने मॅपिंग केले. त्यात पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे.
जानेवारी महिन्यात अचानकपणे डोके वर काढलेल्या स्वाइन फ्लूने अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यभरात धुमाकूळ घातला. यामुळे काही हजार लोकांना याची लागण झाली असून शेकडो जणांचे बळी गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर, राज्याच्या कोणत्या भागात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव जास्त आहे तेथे लक्ष केंद्रीत करण्यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण राज्याचे मॅपिंग केले आहे. पुण्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे ९९ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार ४२ जणांना याची लागण झाली आहे. तर मुंबई या आजाराने ३८ जणांचा बळी घेतला असून १ हजार ३८३ जणांना लागण झाली आहे. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव जास्त आहे. तेथे ८३ जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला असून ४३० जणांना याची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. कांचन जगताप यांनी दिली.
तापमानवाढीने प्रादुर्भाव घटला
राज्यातील तापमानात वेगाने वाढ होऊ लागल्याने गेल्या तीन दिवसांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून स्वाइन फ्लूची लागण झालेले आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. (प्रतिनिधी)

स्वाइन फ्लूचा प्रार्दूभाव
जिल्हामृत्यूलागण
पुणे९९१०४२
मुंबई३८१३८३
नागपूर८३४३०
सातारा७३५

Web Title: The highest incidence of swine flu in Pune, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.