अतिउच्चदाबाची वाहिनी तुटली

By Admin | Updated: September 22, 2016 03:05 IST2016-09-22T03:05:26+5:302016-09-22T03:05:26+5:30

अतिउच्चदाब वाहिनीच्या खांबाला मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान डंपरने धडक दिल्याने २२ हजार किलोवॅट विद्युत प्रवाह वाहून नेणारी अतिउच्चदाब वाहिनी तुटली.

The high-speed channel broke | अतिउच्चदाबाची वाहिनी तुटली

अतिउच्चदाबाची वाहिनी तुटली


कार्लेखिंड : कार्लेखिंड-कनकेश्वरफाटा मार्गावरील मापगाव फाटा याठिकाणी अतिउच्चदाब वाहिनीच्या खांबाला मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान डंपरने धडक दिल्याने २२ हजार किलोवॅट विद्युत प्रवाह वाहून नेणारी अतिउच्चदाब वाहिनी तुटली. ज्या लोखंडी खांबाला धडक दिली तो खांब अवजड असून पूर्णपणे वाकला आहे. त्यामुळे कार्लेख्ािंड, पळी शहापूर, पोयनाडपर्यंतचा परिसरातील विद्युत पुरवठा १८ तास खंडित झाला होता.
त्याचठिकाणी या वाहिनीच्या वरून रेवस उच्चदाबाची विद्युत वाहिनीची क्रॉसिंग आहे. जर का दोन्ही वाहिन्यांना एकमेकांस स्पर्श झाला असता तर मोठा अपघात घडला असता. या घटनेची माहिती समजताच रेवस उच्चदाब विद्युत वाहिनीचे नियंत्रक कनिष्ठ अभियंता संदीप कुराडे आणि पेझारी अतिउच्चदाब विद्युत वाहिनीचे नियंत्रक कनिष्ठ अभियंता संजय पॉल घटनास्थळी हजर झाले आणि सुरू असणारा विद्युत प्रवाह बंद केला. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा म्हणून वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन खांब उपलब्ध करून काम पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. विद्युत पुरवठा मंगळवारी रात्री साडेनऊपासून बंद झाला ते बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अठरा तास वीजपुरवठा खंडित होता. रात्रभर विद्युत पुरवठा नसल्याने या विभागातील नागरिक हैराण झाले. मच्छर असल्याने रात्र अक्षरश: जागून काढावी लागल्याचे नागरिकांनी सांगितले. वीज पुरवठा १८ तास खंडित असल्याने येथील उद्योग व्यवसायावर याचा परिणाम झाला, यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. (वार्ताहर)

Web Title: The high-speed channel broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.