मटक्याचा अंक प्रसिद्ध करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

By Admin | Updated: March 4, 2017 05:31 IST2017-03-04T05:31:56+5:302017-03-04T05:31:56+5:30

मटक्याचे नंबर वर्तमानपत्रात प्रसिद्ध करत असल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत हे नंबर प्रसिद्ध करण्यास अंतरिम स्थगिती दिली.

The High Court's stay to publish the ballot box | मटक्याचा अंक प्रसिद्ध करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

मटक्याचा अंक प्रसिद्ध करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती


मुंबई : सोलापूरमधील सहा वर्तमानपत्रे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या नावाखाली मुंबई व कल्याण मटक्याचे नंबर वर्तमानपत्रात प्रसिद्ध करत असल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत हे नंबर प्रसिद्ध करण्यास अंतरिम स्थगिती दिली. तसेच याप्रकरणी सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी केलेल्या तपासावर आश्चर्यही व्यक्त केले. नक्की आयुक्तांनीच तपास केला का? असा प्रश्न उच्च न्यायालयाला पडला.
आॅल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे प्रेस सेक्रेटरी श्रीगुरुराज पोरे यांनी सोलापूरच्या सहा वर्तमानपत्रांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मटक्यातले हे नंबर पूर्वीपासून वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत आहेत ,मात्र प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. २०१२ मध्ये याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली. दरम्यान, उच्च न्यायालयाने पोलिसांनी याबाबत काय कारवाई केली? अशी विचारणा केली असता सोलापूर पोलीस आयुक्तांचा अहवाल खंडपीठाला दाखवला. अहवालानुसार, सहाही वर्तमानपत्रांच्या संपादकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असता त्यांनी हे नंबर मटक्याचे नसून ज्योतिष व अंकशास्त्राचे असल्याचा खुलासा केला. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे म्हणत पोलीस आयुक्तांनी तपास बंद केला. या अहवालावर उच्च न्यायालयाला आश्चर्यचा धक्काच बसला. ‘संपादकांनी माहिती दिली आणि तुम्ही विश्वास ठेवला? नमके कशासंदर्भात हे नंबर प्रसिद्ध होतात? ६ वर्तमानपत्रांत एकच व्यक्ती नंबरची माहिती देते? ती व्यक्ती कोण? याचा तपास करावासा वाटला नाही? तपास पोलीस आयुक्तांनीच केला ना? पोलिसांनाच त्यांचे प्रमोशन कधी होणार, याचे भाकित संबंधितांनी केले असावे,’ असा टोलाही खंडपीठाने सोलापूर पोलीस आयुक्तांना लगावला. (प्रतिनिधी)
>मटका का जुगाराचाच एक भाग आहे. वर्तमानपत्र कल्याण व मुंबई मटक्याचे नंबर प्रसिद्ध करतात. या नंबरवर पैसे लावले जातात. वर्तमानपत्रे नंबर प्रसिद्ध करून व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याचे पोरे यांनी याचिकेत म्हटले आहे.

Web Title: The High Court's stay to publish the ballot box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.