याचिका निकाली काढण्यास हायकोर्टाचा नकार

By Admin | Updated: August 29, 2015 01:48 IST2015-08-29T01:48:23+5:302015-08-29T01:48:23+5:30

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी दाखल झालेली जनहित याचिका निकाली काढावी, अशी मागणी करणारा एफ. ए. कन्स्ट्रक्शनचा अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

The High Court's denial to withdraw the petition | याचिका निकाली काढण्यास हायकोर्टाचा नकार

याचिका निकाली काढण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई : सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी दाखल झालेली जनहित याचिका निकाली काढावी, अशी मागणी करणारा एफ. ए. कन्स्ट्रक्शनचा अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. तसेच सिंचन घोटाळ्यात पर्यावरण, वन व पुरातत्त्व नियमांचे उल्लंघन झाले असल्याने त्याचीही सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी करणारा अर्जही फेटाळला.
याप्रकरणी आम आदमी पार्टीने जनहित याचिका केली आहे. सिंचन घोटाळ्यात पर्यावरण, वन व पुरातत्त्व नियमांचेही उल्लंघन झाल्याने याचीही सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी पार्टीने केली. याला मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांनी विरोध केला. पर्यावरण, वन व पुरातत्त्व नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. आणि एसीबीचे काम हे भ्रष्टाचार झाला आहे की नाही हे तपासणे
आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांची ही मागणी वैध नाही, असा दावा अ‍ॅड. वग्याणी यांनी केला. तो न्यायालयाने मान्य केला व याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली.

Web Title: The High Court's denial to withdraw the petition