शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकेचा अधिकार शेतकऱ्यांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 06:48 IST

समृद्धी महामार्गात ग्रामपंचायतीच्या मालकीचा भूखंड संपादित करण्यात आला नाही. शेतक-यांच्या वतीने ग्रामपंचायत याचिका दाखल करू शकत नाही.

मुंबई : समृद्धी महामार्गात ग्रामपंचायतीच्या मालकीचा भूखंड संपादित करण्यात आला नाही. शेतकºयांच्या वतीने ग्रामपंचायत याचिका दाखल करू शकत नाही. मात्र खुद्द शेतकरी याचिका करू शकतात, असे म्हणत उच्च न्यायालयाने नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवदे ग्रामपंचायतीने समृद्ध महामार्गाविरुद्ध दाखल केलेली याचिका निकाली काढली.मुंबई ते नागपूर या ७०१ कि.मी. समृद्धी महामार्गाला नाशिकच्या ग्रामपंचायतीने शेतकºयांच्या वतीने विरोध केला. महामार्गासाठी सुमारे ८४ टक्के जमीन शेतकी असून त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारने या महामार्गासाठी पर्यायी जागा शोधावी किंवा प्रस्तावित महामार्गाला समांतर असलेल्या घोटी-सिन्नर याच महामार्गावरून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विकास करावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली होती. न्या. के. के. तातेड आणि व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीचा भूखंड संपादित करण्यात आला नाही. शेतकºयांच्या वतीने याचिका करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही. खुद्द शेतकºयांनी याचिका दाखल करावी, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.याचिकेनुसार इगतपुरी तालुक्यातील एकूण ८२,८१२ हेक्टर जमिनीपैकी सरकारने जंगल, धरणे, संरक्षण दल, रेल्वेमार्ग, महामार्ग, पेट्रोलवाहिनी आणि औद्योगिक विकासासाठी ५४,८९४ हेक्टर जागा यापूर्वीच संपादित केली आहे. आता प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठीही जागा संपादित केली तर इगतपुरी तालुक्यासाठी केवळ २६,११८ हेक्टर जागा शिल्लक राहील. या महामार्गासाठी जिल्हाधिकाºयांनी १८०० हेक्टर जागा संपादित केली0राज्य सरकारने यापूर्वी न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले होते. प्रस्तावित महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांतून जाणार आहे. त्यामुळे या गावांचाही विकास होईल. कृषी उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात कमी वेळेत पोहोचतील; तसेच राज्याचा आर्थिक विकास दर वाढेल. त्याचबरोबर ग्रामीण आर्थिक विकासालाही चालना मिळेल. संतुलित व समान विकास साधण्यासाठी राज्य सरकारने समृद्धी महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.सेटलमेंटद्वारे जमिनी ताब्यात घेणारजे शेतकरी राज्य सरकारच्या धोरणानुसार किंवा योजनेनुसार स्वखुशीने आपली जमिनी देण्यास तयार नसतील तर त्यांच्या जमिनी ‘राईट टू फेअर कॉम्पेनसेशन अ‍ॅण्ड ट्रान्स्परन्सी इन लँड अ‍ॅक्विजिशन, रिसेटलमेंट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन अ‍ॅक्ट २०१३’ अंतर्गत ताब्यात घेण्यात येतील, असेही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMumbai High Courtमुंबई हायकोर्ट