शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या मालमत्तेवरील सुनावणीस उच्च न्यायालयाना नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:59 IST

मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही. त्यामुळे ही याचिका अन्य खंडपीठापुढे दाखल करा, अशी सूचना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली.

मुंबई :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. 

मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही. त्यामुळे ही याचिका अन्य खंडपीठापुढे दाखल करा, अशी सूचना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली.

त्यापूर्वी मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी याचिकाकर्त्यांकडे त्यांची केस लढवण्यासाठी वकील नियुक्त करायचा आहे का? अशी विचारणा केली. ‘या याचिकेमध्ये अनेक कायदेशीर बाबींचा समावेश असल्याने समितीला या याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी वकिलांची आवश्यकता आहे, असे वाटते,’ असे न्या. दत्ता यांनी म्हटले.

 काय आहे प्रकरण?- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुुटुंबीयांनी उत्पन्नाच्या अज्ञात स्रोतांद्वारे बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप गौरी भिडे व त्यांचे वडील अभय भिडे यांनी याचिकेद्वारे केला आहे. याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व सीबीआयद्वारे करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिस तक्रार करूनही काहीही कारवाई करण्यात आली नाही, असे भिडे यांनी याचिकेत म्हटले आहे.- सात-आठ वर्षांपासून मी ‘ना खाऊंगा ना खाने दूँगा’, ‘जो अब तक खाया है, वो भी उगलवा लूँगा’ या ब्रीदवाक्यांनी प्रेरित झाले आहे. देशाचा प्रामाणिक आणि जागरूक नागरिक म्हणून मी केंद्र सरकारला आणखी काही छुपी व बेहिशेबी मालमत्ता शोधून काढण्यासाठी मदत करण्याचा विचार केला आणि त्यातून काही बेहिशेबी पैशाचा शोधही लावला,’ असे जनहित याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाHigh Courtउच्च न्यायालय