मॅगीच्या निर्यातीस हायकोर्टाची परवानगी
By Admin | Updated: June 30, 2015 13:56 IST2015-06-30T12:40:56+5:302015-06-30T13:56:39+5:30
मॅगीच्या निर्यातीस

मॅगीच्या निर्यातीस हायकोर्टाची परवानगी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मॅगीवर बंदी आल्याने हजारो कोटी रुपयांचे नुकसान झालेल्या नॅस्लेला मंगळवारी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. हायकोर्टाने मॅगीची परदेशात निर्यात करण्यास नॅस्लेला परवानगी दिली आहे.
मॅगीमध्ये आरोग्यास हानिकारक पदार्थ आढळल्यानंतर देशाच्या विविध राज्यांमध्ये मॅगीचे उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बंदी विरोधात नॅस्लेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. अन्न व प्रशासन विभागाने मॅगीवरील बंदीचे समर्थन करतानाच परदेशातील यंत्रणांचा आक्षेप नसेल नॅस्लेने देशातील मॅगी नष्ट करण्याऐवजी परदेशात पाठवण्यास आमचा विरोध नाही अशी भूमिका मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर हायकोर्टाने मॅगी निर्यात करण्यास परवानगी दिली.