शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह राज्यसरकारला हायकोर्टाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 19:57 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसरात सार्वजनिक निधीतील १ कोटी ३७ लाख रुपये खर्चून वॉल कम्पाऊंड व अंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहे.

नागपूर, दि. 20 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसरात सार्वजनिक निधीतील १ कोटी ३७ लाख रुपये खर्चून वॉल कम्पाऊंड व अंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहे. त्याविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभाग, मनपा आयुक्त व मनपा स्थायी समिती यांना नोटीस बजावून यावर ३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच संबंधित रकमेला बहुमताने मंजुरी दिली. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे, हरीश ग्वालबंशी, सय्यदा बेगम अन्सारी व बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी संघ परिसरात सार्वजनिक पैसे खर्च करण्यास विरोध केला होता. परंतु, त्यांची दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे संघ परिसरातील विकासकामांवर करदात्यांचे पैसे खर्च करणे अवैध आहे. महानगरपालिका आर्थिक अडचणीत असून अनेक सार्वजनिक योजना रखडल्या आहेत. असे असताना अनोंदणीकृत संघाच्या परिसरात एवढा मोठा खर्च करणे चुकीचे होईल असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले तर, संघातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.अशी आहे विनंती१ कोटी ३७ लाख रुपये मंजूर करण्याचा वादग्रस्त निर्णय रद्द करण्यात यावा व प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध मंजुरी देणाºया पदाधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMohan Bhagwatमोहन भागवत