मराठा आरक्षणावरुन उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले नाहीत - मुख्यमंत्री
By Admin | Updated: October 13, 2016 13:24 IST2016-10-13T13:15:12+5:302016-10-13T13:24:47+5:30
मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयाने सराकारला फटकारलेलं नाही. मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारने वेळ मागितलेला नाही.

मराठा आरक्षणावरुन उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले नाहीत - मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेलं नाही. मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारने वेळ मागितलेला नाही. याचिकाकर्त्यांनी वेळ मागून घेतला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले.
आमचे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी रद्द करा अशी मराठा समाजाची मागणी नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काहीजण जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका. काही मूठभर लोक जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असे फडणवीस यांनी सांगितले. आम्हाला शाहू, फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.