मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी

By Admin | Updated: January 8, 2015 12:35 IST2015-01-08T12:21:24+5:302015-01-08T12:35:47+5:30

मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने मेट्रोच्या दरवाढीला मंजुरी दिली आहे.

High Court clears Mumbai Metro hike | मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी

मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.
मुंबई मेट्रोचे सध्याचे दर १०, १५ आणि २० रुपये असे आहेत. तर मेट्रोचे प्रस्तावित दर १०, २०, ३० आणि ४० रुपये इतके आहेत.
 

Web Title: High Court clears Mumbai Metro hike