दहशतवादी हल्ल्याच्या फोननंतर मुंबईत हायअलर्ट
By Admin | Updated: September 29, 2015 11:47 IST2015-09-29T11:47:18+5:302015-09-29T11:47:18+5:30
मुंबईत विमानतळ व ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणा-या निनावी फोनमुळे मुंबईत हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या फोननंतर मुंबईत हायअलर्ट
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - मुंबईत विमानतळ व ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणा-या निनावी फोनमुळे मुंबईत हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील इंटरनॅशनल व डोमेस्टिक विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलिसांनीही या निनावी फोनचा तपास करायला सुरुवात केली आहे.
सोमवारी रात्री उशीरा विमानतळावरी एका वरिष्ठ अधिका-याला निनावी फोन आला होता. फोन करणा-या व्यक्तीने विमानतळ व ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती. संबंधीत अधिका-याने या फोनची माहिती विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा व मुंबई पोलिसांना दिली आहे. यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी ज्या क्रमांकावरुन फोन आला तो नंबर ट्रेस केल्याचे समजते.