...अहो मी तर आताच आले मतदानाला, वृध्द महिला वंचित
By Admin | Updated: February 21, 2017 14:53 IST2017-02-21T14:46:30+5:302017-02-21T14:53:08+5:30
मी तर मतदान केलेच नाही, मी आता तर आले मतदान केंद्रात...? असा सवाल करत केंद्राध्यक्षांना मतदार वृध्द महिलेने डोक्याला हात लावला.

...अहो मी तर आताच आले मतदानाला, वृध्द महिला वंचित
नाशिक : मी तर मतदान केलेच नाही, मी आता तर आले मतदान केंद्रात...? असा सवाल करत मतदार वृध्द महिलेने डोक्याला हात लावला. कारण संबंधितांनी त्या महिलेला तुमच्या नावावर मतदान झाले आहे, असे सांगून मतदान करता येणार नाही असे बजावले.
नाशिकमधील सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २६ मधील ३९ केंद्रावर सदर प्रकार घडला. मतदार महिलेच्या नावावर दुसऱ्याच महिलेने मतदान केले. ज्या वृध्द महिलेचे अस्सल नाव होते ती महिला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिली. बोगस मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे केंद्रधिकाऱ्यांनी देखील याबाबत उदासिनता दर्शविल्याने सदर प्रकार घडल्याची चर्चा आहे. कारण संबंधितांच्या गलथान कारभारामुळेच या वृध्द महिलेच्या नावावर दुसऱ्या महिलेने मतदान केल्याचा आरोप त्या आजीबार्इंनी केला असून बोटावर ‘शाई’ देखील नसल्याचा पुरावा दाखविला. अखेर अधिकाऱ्यांनी त्या महिलेचे ‘टपाली’ मतदान घेतले.