शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
3
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
4
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
5
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
9
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
10
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
12
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
13
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
14
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
15
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
16
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
17
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
18
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
19
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
20
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

हे मायेपोटी की...? दावणीच्या रेड्याने घेतला मालकाचाच जीव, हिंगोलीतील मन हेलावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 8:01 AM

विशेष म्हणजे, शेतक-याच्या मृतदेहापासून तो हटायला तयार नव्हता आणि कोणाला जवळही येऊ देत नव्हता.

गोरेगाव (जि. हिंगोली) : दहा वर्षांपासून सांभाळलेल्या दावणीच्या रेड्यानेच जोराची धडक देऊन शिंगे पोटात खुपसल्याने शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, शेतक-याच्या मृतदेहाशी तासभर हा रेडा झुंजत होता. मृतदेहापासून तो हटायला तयार नव्हता आणि कोणाला जवळही येऊ देत नव्हता. त्यामुळे शेकडो गावक-यांना हताशपणे हे सर्व पाहण्यापलीकडे काही करता आले नाही.सेनगाव तालुक्यातील चोंढी बु. येथे शनिवारी दुपारीस दोनच्या सुमारास ही घटना घडली. प्रल्हाद रामजी नानवटे (५०) असे मृत शेतक-याचे नाव आहे. नानवटे यांच्याकडे गायी-म्हैशी मोठ्या प्रमाणात होत्या; परंतु वाढत्या चारा टंचाईमुळे त्यांनी त्या सर्व विकून टाकल्या आणि केवळ हा रेडाच दावणीला ठेवला. गेल्या दहा वर्षापासून ते त्याचा सांभाळ करीत होते. नानवटे कुटुंब रेड्याचे नियमित चारा-पाणी करीत असत. विशेष करुन मृत प्रल्हाद यांनी रेड्याला खूप जीव लावला होता.हे मायेपोटी की...?रेड्याच्या धडकेने मयत प्रल्हाद यांचे हाडन् -हाड मोडले होते. धडक दिल्यानंतर रेडा पार्थिवाशी मायेपोटी झुंजत होती की त्याचा राग अनावर झाला होता, हे कळायला मार्ग नव्हता. रेड्याने धडक का दिली असेल, याबद्दल विविध शक्यता गावकरी व्यक्त करीत होते.दोन लाखांनाही नाही विकला...ह्या रेड्याला काही दिवसांपूर्वी दोन लाखांना मागणी आली होती. परंतु प्रल्हादरावांनी रेड्याला लावलेल्या मायेपोटी त्याची विक्री केली नव्हती. आज त्याच रेड्याने त्यांचा जीव घेतल्याने गावकरी अचंबित झाले होते. ही कसली आली माया...असा भाव प्रत्येकाच्याच चेह-यावर होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी