शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी

By admin | Updated: July 31, 2016 01:05 IST

पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली

मंचर : पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली. चोरट्यांच्या मारहाणीत शिवाजी सखाराम हिंगे (वय ६५) व मंदाबाई शिवाजी हिंगे (वय ६०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.काठापूर बुद्रुक येथे रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गणेशवस्ती येथे महादेव गोपाळ मुळूक यांचे घर आहे. मुळूक मुंबईला राहत असल्याने घराला कुलूप होते. कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. त्यांनी आतील कपाट फोडले आहे. घरमालक मुंबईला असल्याने किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती समजली नाही. ज्ञानेश्वर भागा जाधव यांची दोन घरे आहेत. एका घरात जाधव कुटुंबीय झोपले होते. दुसऱ्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील शेंगदाणे व लहान मुलांचे कपडे चोरून नेले. पांडुरंगवस्ती येथील लहू जंगल जाधव यांच्या घराची कडी चोरट्यांनी तोडली. मात्र आवाज झाल्याने लहू यांची पत्नी जागी होऊन तिने आवाज दिला, त्यामुळे चोरट्यांना पळ काढावा लागला.गणेश शिवाजी हिंगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश गट्टे व पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याची माहिती गोडसे यांनी दिली. >गणेशनगर येथे शिवाजी सखाराम हिंगे राहतात. पहाटे ३ वाजता दोन चोरट्यांनी चहाच्या टपरीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. चोरट्यांनी घरात जाऊन शिवाजी व मंदाबाई यांना हत्याराने मारहाण केली. त्यांना तातडीने उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे पाठवण्यात आले आहे. चोरट्यांनी टपरीतील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. मंदाबाई हिंगे यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने चोरून नेले.