हेमा मालिनींवर खैरात का?

By Admin | Updated: March 18, 2016 02:13 IST2016-03-18T02:13:19+5:302016-03-18T02:13:19+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनींना देण्यात आलेल्या भूखंडावरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

Hema Malini's bailout? | हेमा मालिनींवर खैरात का?

हेमा मालिनींवर खैरात का?

- मुनगंटीवार-पावसकर शाब्दिक चकमक

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनींना देण्यात आलेल्या भूखंडावरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना पावसकर यांनी हेमा मालिनींच्या भूखंडाचा विषय छेडला. अभिनेता अक्षयकुमारने श्रीमंतांवर १ टक्का कर लावून ती रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असे विधान केले, तेव्हा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या विधानाचे स्वागत केले. मात्र, हेच त्यांनी हेमा मालिनी यांना स्वस्तात जमीन देण्याऐवजी ते पैसे शेतकऱ्यांना दिले असते, तर फार बरे झाले असते, असे पावसकर म्हणाले. ज्या विषयाशी माझा संबंध नाही, तिथे माझा उल्लेख करू नका, असे बजावतानाच मुद्द्यावर बोलण्याची तंबीच मुनगंटीवारांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Hema Malini's bailout?