हेमा मालिनीही रोज दारू पितात, शेतकरी आत्महत्येवर बोलताना बच्चू कडूंची जीभ घसरली
By Admin | Updated: April 13, 2017 15:56 IST2017-04-13T14:43:11+5:302017-04-13T15:56:36+5:30
शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, या मुद्यावर प्रतिक्रिया देत असताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

हेमा मालिनीही रोज दारू पितात, शेतकरी आत्महत्येवर बोलताना बच्चू कडूंची जीभ घसरली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, या मुद्यावर प्रतिक्रिया देत असताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हेमा मालिनी रोज बंपर दारू पितात, पण अजून आत्महत्या नाही केली, असं वादग्रस्त विधान बच्चू कडून यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे. त्यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
लग्नाचा खर्च जास्त झाला म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, दारू पिऊन शेतकरी आत्महत्या करतात, वेगवेगळ्या नेत्यांच्या विधानांवर आक्षेप घेत बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
"नारायण राणे म्हणाले होते की दारु पिऊन आत्महत्या होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणत होते की लग्नाचा खर्च जास्त झाल्यावर शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात. वेगवेगळ्या लोकांनी अशी विधानं केलेली ऐकतो. त्यांना माझा असा सवाल आहे की, दारु कोण पित नाही? 75 टक्के आमदार, खासदार, पत्रकारही दारू पितात. हेमामालिनी तर रोज बंपर दारु पितात, मग अजून आत्महत्या केली नाही",असं वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केले आहे.